Mobile phone pros and cons

भ्रमणध्वनी वापरण्याचे काही फायदे आणि तोटे

आपण बर्‍याच वेळे स्मार्टफोन वापरतो का? आपण आपल्या मोबाईल फोनशिवाय थोडा वेळ सुद्दा जगू शकत नाही का? तुमचा मोबाइल फोन तुम्हला वरदान आहे की शाप?

वरील काही प्रश्नच्या उत्तरासाठी येथे मी मोबाईल फोनचे काही फायदे आणि तोटे देत आहे

काही फायदे

१. मोबाईल आपल्याला मित्र आणि कुटुंबियांसोबत महत्वपूर्ण संभाषणकरण्यासाठी अत्यंत उपयुक्त्त आहे
२. मोबाईल लेखी स्वरुपात संदेश तात्काळ पाठविण्यास मदत करतो
३. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स देखील एका बटणाचा क्लिकवर पाठविले जाऊ शकतात
४. कॅमेरा, अलार्म, कॅल्क्युलेटर या सारखे कित्येक अतिशय उपयुक्त एप्स मोबाईल फोनवर उपलब्ध असतात
५. मोबाइल फोनचे जीपीएस वापरुन कोणत्याही ठिकणाचा शोध लागू शकतो
६. इंटरनेट सुविधेचा लाभ मोबाईल वापरुन कोठेही घेता येतो
७. ऑनलाईन शॉपिंग व मोबाईल बँकिंग मोबाइल फोन वापरुन करता येते
८. मोबाइल फोनद्वारे आपण आपल्या जवळच्या आणि प्रियजनांना व्हिडिओ कॉल करू शकतो
९. हे सहजपणे चार्ज केले जाऊ शकते
१०. हे पोर्टेबल आहे आणि बिनतारी आहे म्हणून ते एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी सहजपने नेले जाऊ शकते.

काही तोटे

१. दीर्घकाळ मोबाईल चा वापर केल्याने आपल्या डोळ्यांवर परिणाम होतो.
२. वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणे आपल्या आणि दुसर्यांचा जीवासाठी धोकादायक ठरू शकते
३. विद्यार्थी शिक्षण घेत असताना मोबाईल फोनमुळे त्यांचे लक्ष्य विचलित होते
४. आपली वैयक्तिक माहिती चुकीच्या इसमांचे हातात पोहोचण्याची शक्यता असते
५. मोबाईल फोनचा जास्त वापर केल्यामुळे निद्रानाश होऊ शकतो
६. फोनची सवय लागल्याने मुले बाहेर जाऊन खेळत नाहीत म्हणून मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे

निष्कर्ष


तर, मोबाईल फोनच्या विविध प्रकारांचे फायदे आहेत तसेच तोटे पण आहेत.

असे म्हणू शकतो की, आपल्याला मोबाइल फोनच्या योग्य वापर समजायला हवा. मोबाईल फोन मोबाईलला गेम्स खेळण्यासाठी किंवा बर्‍याच वेळ व्हिडिओं पाहण्यासाठी नाही.
म्हणून आपल्याला मोबाईल फोन मर्यादित काळासाठी वापरता आला पाहिजे आणि तो फक्त कॉल करणे, अभ्यास करणे यासारख्या अत्यावश्यक कामांसाठी वापरा. खूप जास्त वेळ मोबाईल फोन वापरू नका त्यामुळे त्याची व्यसनाधीनता येऊ शकते.

अभ्यास कसा करावा? – ह्याविषयी काही महत्त्वपूर्ण टिप्स

How to study? … a few important tips

अभ्यास कसा करावा? – ह्याविषयी काही महत्त्वपूर्ण टिप्स

बरेच विद्यार्थी एकत्र बसून तासन् तास अभ्यास करतात. परंतु जर आपण त्यांना ‘काल काय अभ्यास केला?’ याबद्दल विचारले तर त्यांना आठवत नाही. आपण जर वाचलेल्या गोष्टी लक्षात ठेवू इच्छित असू तर आपण ज्या ठिकाणी अभ्यास करतो ते ठिकाण महत्वाची भूमिका बजावत असते.

अशाच प्रकारे, आपण काही खबरदारी चे उपाय केल्यास आपण जे वाचत असतो त्या गोष्टी आपल्या मेंदूत कशा लक्षात ठेवता येतील? ह्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया.

१. अभ्यास करत असताना घरच्या लोकांना सांगून ठेवा जेणेकरुन तुम्ही अभ्यास करत असतांना ते तुम्हाला काही कामे सांगणार नाहीत व त्यामुळे तुमची अभ्यासातील एकाग्रता भंग होणार नाही.

२. अभ्यास करत असताना तुम्ही तुमचा मोबाइल फोन बंद ठेवला पाहिजे.

३. अभ्यासाला बसण्यापूर्वी – तुम्हाला किती वेळ शिकायचे आहे, कोणता विषय शिकायचा आहे, अशा गोष्टी आपण वेळेच्या आधी ठरवून अभ्यास सुरू करायला हवा.

४. अभ्यासाशी संबंधित सर्व पुस्तके तुम्ही जवळच आहे हे सुनिश्चित केले पाहिजे तसेच एक पेन आणि एक नोटबुक सुद्धा जवळ ठेवायला हवे. यामुळे तुमच्या अभ्यासाचा वेळ योग्य पद्धतीने मार्गी लागेल आणि तुमचा अभ्यास कोणताही अडथळा न येता होईल.

५. तसेच, अभ्यास करताना तुम्ही तुमचे डोके स्थिर ठेवले पाहिजे आणि डोळे हलवत अभ्यास केला तर तो तुम्हाला जलद वाचनास आणि अधिक एकाग्रतेने अभ्यास करण्यास मदत करेल.

५. ज्या ठिकानी तुम्ही अभ्यास करू इच्छिता ते ठिकाण तुम्ही सुनिश्चित केले पाहिजे की ते एक शांत ठिकाण आहे आणि तेथे काही गोंधळ होत नाहीये.

६. तुम्ही जिथे अभ्यास करत आहात तेथे एक स्टूल किंवा टेबल आहे याची खात्री करुन घ्यावी. बेडवर पडून किंवा सोफ्यावर पडून अभ्यास करू नये. जर तुम्ही असे केल्यास, त्याचा परिणाम तुमचा एकाग्रतेवर पडेल.

७. तसेच, दोन तास एकसारखे अभ्यास करण्यापेक्षा एक तास सक्रियपणे अभ्यास करणे चांगले आहे. परंतु जर तुम्हाला जास्त कालावधीसाठी अभ्यास करायचा असेल तर दहा किंवा पंधरा मिनिटांचा आराम करून पुन्हा अभ्यास करणे चांगले.

८. त्याचप्रमाणे, जेवणानंतर लगेच अभ्यास करणे चांगले नाही. जर तुम्ही असे केले तर तुम्ही झोपी येण्याची शक्यता आहे. जेवण घेतल्यानंतर, थोड्या वेळासाठी इकडे तिकडे फिरा आणि नंतर अभ्यास करा हे अधिक चांगले आहे.

तुम्ही वरील काही गोष्टींचे अनुसरण करत अभ्यास केला तर तुम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय, एकाग्रतेसह चांगले अभ्यास कराल ह्यात शंका नाही.

Happy studying…

इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT)

– डॉ.आशिष विखार Ph.d (Mech. Engg.)

इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) प्रश्नोत्तरे

डॉ.आशिष विखार Ph.d (Mech. Engg.)

इंटरनेटमुळे जग जवळ आलं आहे. Networking, Facebook , Whatsapp , E-mails या गोष्टी आता रोजच्या जीवनात समाविष्ट झाल्या आहेतच; परंतु त्याही पलीकडे जाऊन इंटरनेट आपल्यासाठी किती तरी गोष्टी करू शकतं हे IoT मुळे लवकरच आपल्या लक्ष्यात येईल. पुढील काही दशकांत अनेक गोष्टीचं IoTization झालेलं असेल आणि आतापेक्षा कितीतरी वेगळं आणि smart जग आपल्याला अनुभवायला मिळेल ह्यात शंका रहानार नाही. कारण सध्या IoT हा सर्वच स्तरांवर संशोधनाचा विषय झालाय. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत IOT बद्दल.

थिंग्जमुळे पूर्वी ज्या कित्येक गोष्टी आपण करू शकत नव्हतो, त्या करणं आता आपल्याला शक्‍य होणर आहे. घरच्या सीसीटीव्हीतून घरचा व्हिडिओ सतत आपल्या मोबाईलवर येत असल्यामुळे आपण ऑफिसमध्ये असलो, तरी आपल्या घरी काय चाललेलं आहे, घरात चोर शिरलेला आहे का, हे आपण पाहू शकतो आणि मग घरी खरंच चोर शिरला असेल, तर आपण पोलिसांना फोन करू शकतो. आपण कुठूनही आपल्या घरातली किंवा ऑफिसमधली आपली उपकरणं किंवा डिव्हायसेस चालू किंवा बंद करू शकतो आणि नियंत्रित करू शकतो; आपण परदेशात असलो तरीसुद्धा आपल्या घरातला कॉम्प्युटर घरातला हीटर एसी, गॅस, पंखा अशी उपकरणं चालू / बंद करू शकतो, त्यांचा वेग कमी/जास्त करू शकतो.  आपण घरी आल्या आल्या आपण असलेल्या रूम मधील lights fans on होणे , आपल्या नेहमीच्या उठण्याच्या वेळी अलार्म वाजणे, घराबाहेर जाताना चुकून घरी काही सुरु राहिलं म्हणजे fridge चं दार किंवा एखादा fan तर त्वरित आपल्याला notification मिळणे ह्यासारख्या अनेक गमतीशीर गोष्टी प्रत्यक्षात येणे शक्य आहे IOT मुळे. पाहुयात इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) – प्रश्नोत्तरे

१) इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय?

आज आपण ज्यास ‘इंटरनेट’ म्हणतो, ते म्हणजे संगणकांचं एक जाळं आहे. संगणक, स्मार्ट फोन, टॅबलेट यांसारख्या साधनांनी आपण इंटरनेटशी जोडले जातो. पण आपल्या रोजच्या आयुष्यात आपण या गोष्टी सोडून इतर अनेक वस्तूही वापरतो. उदाहरणार्थ- अलार्म, पाणी तापवण्याचे गिझर, फ्रिज, विजेचे दिवे, मोटारसायकल, कार आणि इतर अनेक हजारो गोष्टी. माणसांप्रमाणेच उद्या या वस्तूही इंटरनेटद्वारे एकमेकांशी संवाद साधू लागल्या आणि त्यानुसार काम करू लागल्या तर? वस्तूंच्या इंटरनेटच्या या संकल्पनेला ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ (Internet Of Things – IoT) असे म्हणतात. Internet of Things म्हणजेच सध्याच्या devices व्यतिरिक्त इतर ‘Things‘ म्हणजे  ……कार, घरातील electronics appliances, kitchen मधील devices, heart monitors  हे व असे इतर अनेक devices हे इंटरनेटशी connected असतील IOT मार्फत.

२) इंटरनेट ऑफ थिंग्स ची संकल्पना कोणी मांडली?

एमआयटी शास्त्रज्ञ केव्हिन अष्टोन यांनी १९९९ मध्ये प्रथमतः इंटरनेट ऑफ थिंग्जची संकल्पना मांडली. भविष्यात, इंटरनेट क्रांतीमुळे व मायक्रो-सेन्सर्सच्या प्रगतीमुळे संगणकाला माहितीसाठी मानवाची आवश्यकता भासणार नाही, तर उलटपक्षी संगणकच आपापसात माहितीचे आदानप्रदान करून मानवी जीवन सुसह्य करतील. भौतिक जग, संगणक व इंटरनेट यांची एकत्रित प्रणाली मानवाच्या कमीतकमी सहभागाशिवाय बिनचूक व अधिक कार्यक्षम यंत्रणा उभारू शकेल.

३) इंटरनेट ऑफ थिंग्स कशा पद्धतीने काम करेल?

इंटरनेट ऑफ थिंग्स’मध्ये अर्थातच वस्तू सध्या आहेत तशाच वापरता येणार नाहीत. त्या वस्तूंना ‘स्मार्ट’ बनवावं लागेल. या स्मार्ट वस्तूंमध्ये सेन्सर्स असतात, जे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती गोळा करू शकतात. उदाहरणार्थ, आपण वापरत असलेल्या स्मार्ट फोनमध्ये कितीतरी सेन्सर्स आहेत, ज्याद्वारे आपण कुठे आहोत हे समजते GPS); आपला फोन सरळ आहे, आडवा आहे की उलटा, हे कळते (Accelerometer); फोनचा वेग किती आहे, हे समजते (Pedometer); याशिवाय दिशादर्शक, बारकोड वाचणारे, हृदयाचे ठोके मोजणारे असे अनेक सेन्सर्स आपल्या फोनमध्ये आहेत. या सर्वामुळे आज आपण अनेक गोष्टींसाठी आपला स्मार्ट फोन वापरू शकतो.

‘इंटरनेट ऑफ थिंग्स’मधल्या वस्तूदेखील अशाच प्रकारे माहिती गोळा करू शकतील. स्मार्ट बनण्यासाठी लागणारी पुढची गोष्ट म्हणजे- इंटरनेटवर इतर गोष्टींशी संवाद करण्याची क्षमता असेल. हा संवाद दुहेरी असेल. म्हणजेच एखाद्या वस्तूंने जमा केलेली माहिती इंटरनेटद्वारे दुसऱ्यांना- माणसांपर्यंत वा इतर वस्तूंपर्यंत पोहोचवली जाईल. तसेच इतरांकडून आलेल्या माहितीनुसार त्यावर कृती करणंही शक्य होईल.

वॉल्ट डिजने कंपनी निर्मित ‘टॉय स्टोरी’ किंवा ‘कार्स’ नावाचा सिनेमा आठवतो का? ज्यात खेळण्या व गाड्या एकमेकांशी बोलतात. इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे असंच काहीसं प्रत्यक्षात आहे जिथे झाडे, प्राणी, मानव, शहरातील इमारती, रस्ते, हवा, पाणी, गाड्या एकमेकांशी संवाद साधू शकतील. वाटते ना गंमत? पण तंत्रज्ञान क्रांतीमुळे हे शक्य झालंय. इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे एक अशी व्यवस्था ज्यात स्वतंत्र ओळख (आयडी) असलेली यांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक तसेच डिजिटल उपकरणे आंतरजालाद्वारे (नेटवर्क) एकमेकांना जोडलेली असतील व इंटरनेटमार्फत मानवाच्या हस्तक्षेपाशिवाय एकमेकांसोबत प्रत्यक्षदर्शी (रिअल-टाइम) माहितीचे आदानप्रदान करू शकतील. 

) इंटरनेट ऑफ थिंग्स आपलं जीवन कसं बदलेल?

इंटरनेट ऑफ थिंग्स’चे आपल्या दैनंदिन आयुष्यात तसेच औद्योगिक विश्वात खूप सारे उपयोग आहेत. फिटनेस बँड, स्मार्ट वॉच ही याचीच काही उदाहरणे. स्मार्ट होम्सअंतर्गत येणाऱ्या घरातल्या खूप साऱ्या सोयीसुविधा- जसे की- तुम्ही उठण्यापूर्वीच सुरू झालेला गिझर, संध्याकाळ होताच स्वत:हून लागणारे दिवे, दूध संपलं आहे हे बघून ते स्वत:च ऑर्डर करणारे फ्रिज आदी ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’मुळे शक्य आहेत. अगदी पुलंनी वर्णन केलेलं घर- ज्यात नको असलेले पाहुणे आले की दाराशीच त्यांना एक कुत्रा चावतो, हेही ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’मुळे होऊ  शकतं! गमतीचा भाग सोडला, तर याचा वापर करण्याच्या अमर्याद शक्यता आहेत- ज्या पूर्णपणे माणसाच्या कल्पकतेवर अवलंबून आहेत. त्यामुळेच येणाऱ्या काळात ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ आपलं पूर्ण जीवनच बदलून टाकेल असं म्हणता येईल.

) इंटरनेट ऑफ थिंग्स औद्योगिक क्षेत्रात कसे काम करेल?

औद्योगिक विश्वात तर याचे खूपच फायदे आहेत. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये (Fourth Industrial Revolution किंवा इंडस्ट्री ४.0) ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ हा एक महत्त्वाचा घटक आहे. औद्योगिक प्रक्रियेमध्ये कार्यक्षमता वाढवून किंमत कमी करणे आणि ग्राहकांना उत्तम सेवा पुरवणे यासाठी ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’चा उपयोग होतो आहे. याचे एक उदाहरण म्हणजे तुमच्या गाडीमध्ये बसवलेला सेन्सर तुमच्या गाडीची माहिती गोळा करून इंटरनेटद्वारे त्या गाडीच्या कंपनीला पाठवत राहील. त्या माहितीचे विश्लेषण करून कंपनी गाडीत काही समस्या आहे का, किंवा येणाऱ्या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे का, हे बघू शकेल आणि त्यानुसार ग्राहकांना कळवू शकेल. तसेच जर एखादी समस्या खूप साऱ्या गाडय़ांमध्ये येत असेल तर त्यावरूनही ते त्यांच्या प्रक्रियेमध्ये बदल करून सगळ्यांसाठीच उपाययोजना करू शकतात.

) इंटरनेट ऑफ थिंग्स मधील धोके कोणते?

इंटरनेट ऑफ थिंग्स’मध्ये बऱ्याच माहितीची देवाणघेवाण इंटरनेटच्या माध्यमातून होत राहते आणि अशा बऱ्याच वस्तू या येणाऱ्या माहितीच्या आधारे काम करतात. यामुळे इंटरनेटवरचे जे धोके असतात, ते इथेही लागू पडतात. सुरक्षितता आणि गोपनीयता हा निश्चितच कळीचा मुद्दा आहे आणि येणाऱ्या काळात ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ किती वेगाने वाढेल, हे सर्वस्वी त्यावर अवलंबून आहे. नवीन तंत्रज्ञान, त्यामुळे निर्माण होणाऱ्या नवीन शक्यता आणि समस्या, त्याची तंत्रज्ञानानंच शोधलेली नवीन उत्तरं हा नावीन्याचा आणि नवनिर्मितीचा खेळ तर चालूच राहणार. तंत्रज्ञानामुळे होणारे बदल समजावून घेणे आणि योग्य वेळी ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे हे मात्र आपल्याला करता आलं पाहिजे!

) इंटरनेट ऑफ थिंग्स मुळे नजीकच्या काळात काय होईल?

इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) च्या प्रभावामुळे वर्ष २०२० पर्यंत साधारणतः तीन हजार कोटी उपकरणे एकमेकांना जोडली जाण्याचा अंदाज आहे. येणाऱ्या काळात जग माहितीच्या आदानप्रदानावरच आधारित व अनुषंगिक स्वरूपाचे असेल.

) इंटरनेट ऑफ थिंग्स चा विविध देशांनी कसा वापर केला आहे?

मँचेस्टर येथे सिटिव्हर्व उपक्रमांतर्गत स्मार्ट बसथांबे (बसस्टॉप्स) बसविण्यात आले आहेत जिथे प्रवासी प्रतीक्षा करीत असल्यास बसचालकाला तत्काळ माहिती मिळते. तसेच बसथांब्यावरील स्वयंचलित दिवे फक्त प्रवासी असतानाच गरजेनुसार चालू-बंद होतात. 

आंतरजाल (मेश नेटवर्क) तंत्रज्ञानाचा वापर करून व्हेनिअम नावाची पोर्तुगीज कंपनी शहरातील सर्व वाहनांचे रूपांतर वायफाय हॉटस्पॉटमध्ये करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

पोर्टो हे जगातील पहिले असे शहर आहे जिथे घन-कचरा जमा करणाऱ्या गाड्या तसेच बसगाड्यांचा वापर करून फिरते इंटरनेट (इंटरनेट ऑफ मूव्हिंग थिंग्ज) पुरवले जाते. फिनिश स्टार्टअप इनेवो शहरातील कचरापेट्यांवर सेन्सर्सचा वापर करून त्या किती भरल्या आहेत किंवा कसे याची प्रत्यक्षदर्शी माहिती कचरा गोळा करणाऱ्या व कचरा-प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना पुरवते त्यामुळे एकूण कार्यक्षमता वाढल्याचे लक्षात आले आहे. 

बार्सिलोनास्थित ऊरबायोटिका नामक कंपनी शहरातील वाहनतळ व्यवस्था (पार्किंग) कार्यक्षम बनविण्यासाठी सेन्सर्सचा प्रभावी वापर करत आहे. बिनतारी (वायरलेस) सेन्सर्सद्वारे वाहतुकीची प्रत्यक्षदर्शी माहिती वाहनचालकांना पुरविल्यामुळे शहरातील वाहतूक गर्दीची समस्या दहा टक्क्यांनी खाली आणण्यात यश मिळाले आहे. 

टीझेडओए कंपनीने शहरातील हवेतील प्रदूषण, तापमान, आद्रता, हवेचा दाब, प्रकाश आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांची तीव्रता मोजण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

विचार करा की आपल्या अनुपस्थितीत आपली सायकल एखाद्याला वापरायला द्यायची आहे. परंतु, कुलूप खोलण्यासाठी चावी कशी पाठवायची? अशावेळी चावीच्या प्रत्यक्ष देवाण-घेवाणीशिवाय पर्यायच नसतो. हल्ली चावी-विरहित कुलुपांनी काही प्रमाणात ही समस्या सोडवली आहे. परंतु, त्या प्रक्रियेतदेखील सांकेतिक शब्द (पासवर्ड) समोरच्या बरोबर शेअर करावा लागतो. यावर उपाय म्हणून बिटलॉक कंपनीने मोबाइल अॅपच्या माध्यमातून चावी शेअर करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे आपण जगात कुठेही असलो तरी फक्त मोबाइलने सायकलचे कुलूप उघडता येते व सुरक्षितपणे सायकल शेअर करता येते. हेच तंत्रज्ञान गाडी, घर अशा गोष्टी शेअर करण्यासाठी वापरण्यात येईल.

 इंग्लंडमध्ये ऑक्सफोर्ड येथे फ्लड नेटवर्क कंपनी पूरसदृश्य काळात विविध ठिकाणांहून पाण्याच्या पातळीची प्रत्यक्षदर्शी माहिती यंत्रणेला पुरवते. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थेला तसेच पर्यावरण कंपन्यांना तत्काळ उपाययोजना करण्यासाठी माहितीचा उपयोग होतो.

९) स्मार्ट सिटी च्या निर्मितीत इंटरनेट ऑफ थिंग्स चे कसे योगदान असेल?

स्मार्ट शहरांच्या विकासात इंटरनेट ऑफ थिंग्जची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भविष्यात आयओटीमुळे शहरी जीवनात आमूलाग्र बदल होणार आहेत. मानवी शरीर, प्राणी तसेच बांधकाम वस्तूंमध्ये नॅनोसेंसर स्थापित करून वैद्यकीय, शेती, स्थापत्य व औषधनिर्मिती क्षेत्रात भविष्यात मोठी प्रगती होऊ घातली आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (आयडीसी) नुसार वर्ष २०२० पर्यंत इंटरनेट ऑफ थिंग्ज क्षेत्रात १.७ ट्रिलियन डॉलर्सची उलाढाल अपेक्षित आहे. अर्थात एवढी मोठी व्यवसाय संधी जगभरातील नवउद्योजक व व्यावसायिकांना भुरळ न घालेल तर नवलच!

१०) इंटरनेट ऑफ थिंग्स चा शेतीमध्ये कसा उपयोग होईल?

आयओटी शेतीमध्ये पाणी कुठं कमी आहे, कुठं जास्त आहे, कुठं खतांची गरज आहे, हे तिथं बसवलेले सेन्सर्स आपल्याला पाठवत असलेल्या संदेशांमुळे कळू शकतं. आत्ताची हवामानाची स्थिती काय आहे, त्यामुळे कुठली पिकं, केव्हा घ्यावीत हे सर्व आपण ठरवू शकतो.

एकूणच काय तर वाहतूक, आरोग्य, पर्यावरण, सेवा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता, सुरक्षा अशा विविध यंत्रणा आपापसात जोडल्या जाऊन एकात्मिक परिणामासाठी काम करणे इंटरनेट ऑफ थिंग्स मुळे शक्य आहे. त्यादृष्टीने आता तंत्रज्ञ प्रयत्नशील आहेत.

११) सप्लाय चेन मध्ये त्याचा कसा वापर होईल?

सप्लाय चेनमध्ये आयओटीचा खूप उपयोग होईल. आयओटीमुळे आरएफआयडी टॅग्जना आपल्याला दुकानात किंवा एखाद्या मॉलमध्ये किती माल शिल्लक राहिला आहे यावर लक्ष ठेवता येतं. माल एका ठराविक पातळीपेक्षा कमी झाल्यावर पुन्हा नवीन माल घेण्याकरता आपल्याला त्याची माहिती तत्काळ त्या मालाच्या सप्लायरला दिली जाईल. आयओटीमुळे कुठं माल पाठवण्यापूर्वीच त्या मार्गाची परिस्थिती, त्या गोडाऊनपर्यंत लागणारा वेळ, त्या गोडाऊनमध्ये तो माल ठेवायला पुरेशी जागा आहे का नाही, त्यासाठी लागणारं मनुष्यबळ आहे का नाही, तिथं पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे की नाही ही सर्व माहिती तो माल पाठववणाऱ्याच्या मोबाईलवर आल्यामुळं ट्रक्‍स, मनुष्यबळ, गोडाऊन्स, वाहतुकीचं कार्यालय या सगळ्यांमध्ये सुसंवाद होऊन चांगलं नियोजन होऊ शकतं. सप्लायर वेगवेगळ्या ट्रक्‍समधून आणि ट्रेन्समधून आपल्या ग्राहकांना वस्तू पुरवतो, तेव्हा सप्लायरचं गोडाऊन, ट्रक्‍स, ट्रेन्स, ग्राहकांचं वेअरहाऊस हे सगळेच इंटरनेटला जोडले असल्यामुळे माल कुठपर्यंत आला आहे, तो केव्हा पोचेल, अशा अनेक गोष्टींवर ग्राहकाला आणि सप्लायरला दोघांनी नियंत्रण ठेवता येईल.

12)  इंटरनेट ऑफ थिंग्स चा खेळत कसा उपयोग होईल?

ब्रिस्टल येथील सिटीझन सेन्सिंग उपग्रामांतर्गत फुटबॉलसारख्या उत्पादनांमध्ये सेन्सर्सचा वापर करून नागरिकांच्या गरजा समजावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. क्रीडाक्षेत्रात आयओटी आधारित क्रिकेट बॅट, टेनिस रॅकेटचा वापर करून खेळाडू स्वतःच्या खेळाचे विश्लेषण करू शकतो व आपली कामगिरी सुधारू शकतो.

इंटरनेट ऑफ थिंग्जची बाजारपेठ एप्रिल 2015 मध्ये नव्वद हजार कोटी डॉलर इतकी होती. ती सन 2024 पर्यंत 4.3 लाख कोटी डॉलर डॉलर्स असेल, असा एक अंदाज आहे. काही लोकांच्या अंदाजानुसार, ही किंमत कित्येक देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नांपेक्षा जास्त आहे!

Home

God made the world so beautiful

देवाने हे जग इतके सुंदर बनविले आहे…

मित्रांनो थोडा विचार केला तर, या जगात सर्वकाही अनुकरण करण्यासारखे असंख्य उदाहरणे आहेत. त्यापैकी काही उदाहरणे पुढील प्रमाणे देता येतील.

१. कोळी हा एक जीव त्याच जाळं तुटल्यावर त्याबद्दल सूड न उगवता त्वरित नवीन जाळं पुन्हा तयार करण्यास तो सुरवात करतो.

२. असंख्य वेळा आपटल्यानंतर पुन्हा पुन्हा जोमाने उसळणाऱ्या समुद्राच्या लाटा आपल्या दृष्टीने एक उदाहरण आहेत.

३. जी रोप अंकुरण्यासाठी जमिनीला चिरडत बाहेर येतात ती आपल्यासाठी एक उदाहरण आहे.

४. मार्गात अनेक अडथळे असतानाही सरळ पुढे जाणारे बाण आपल्यासाठी एक उदाहरण आहे.

५. प्रतिद्वंद्वी शक्तिशाली असला तरी सूर्याला झाकून ठेवणारे ढग आपल्यासाठी एक उदाहरण आहे.

६. जे अशक्य आहे हे माहिती असतानाही आकाशास स्पर्श करण्याचा इच्छा ठेवणारा पतंग आमच्यासाठी एक उदाहरण आहे.

७. फ़ुलं ज्या ठिकाणी आहे त्या सभोवतालच्या ठिकाणी गोड सुगंध पसरवणारे फूल आपल्यासाठी एक उदाहरण आहे.

८. जे झाड प्रचंड उष्णता सहन करते परंतु थंड आणि आनंददायी छाया देते, ते आपल्यासाठी एक उदाहरण आहे.

९. वेगळे असलेल्या दोघा कापडाना पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न करणारी सुई आपल्यासाठी एक उदाहरण आहे.

१०. जग अंधारात नसावे म्हणून दररोज प्रकाशणारा सूर्य हा आपल्यासाठी एक उदाहरण आहे.

११. पावसाचा थेंब जरी छोटा असला तरी पृथ्वीची तहान शांत करण्यासाठी तो प्रयत्न करतो हे आपल्यासाठी एक उदाहरण आहे.

१२. अंधाराने वेढलेला असला तरी आपल्याला आनंददायक चांदणं देणारा चंद्र हा आपल्यासाठी एक उदाहरण आहे.

१३. आपण एकदा थोडेसे अन्न दिल्यानंतर जिवंतपणासाठी विश्वासू राहणारा कुत्रा आपल्यासाठी एक उदाहरण आहे.

१४. आपले आयुष्य कमी असाले तरी नेहमीच आनंदी राहोणारे फुलपाखरू हे आपल्यासाठी एक उदाहरण आहे.

१५. दूध पाण्यात मिसळून दिल्यावर फक्त दूध पिते पण पाणी नाही, असे करणारी हंस सांगते की फक्त चांगले घ्यावे आणि वाईट नव्हे.

म्हणूनच मित्रानो मी पुन्हा सांगतो की जर थोडा विचार करून पाहिल्यानंतर असे आढळेल की खरोखर या जगातील प्रत्येक गोष्ट आपल्या साठी आदर्शच आहे.

“To-Do List” बनविण्याचे महत्व

“To-Do List” बनविण्याचे महत्व


To-do List म्हणजे काय?

तर त्याची व्याख्या अशी सांगता येईल, “आपल्याला आवश्यक असलेल्या कामांची यादी बनविणे किंवा आपण करू इच्छित असलेल्या महत्वपूर्ण गोष्टींचं टिपण करून ठेवणे म्हणजेच To-do list.”

यशस्वी लोक त्यांची कार्ये, ध्येय किंवा इच्छित कामे साध्य करण्यासाठी काय करत असतील याबद्दल आपल्याला नेहमीच उत्सुकता असते.असे आढळले आहे की, यशस्वी लोकं आपले प्रत्येक काम लिहून ठेवतात आणि कोणते काम अधिक महत्वाचे आहे त्याचे वर्गीकरण करतात आणि नंतर त्या कामांना लहान लहान कामामध्ये विभाजित करतात.

काहींना To-Do-List चे महत्त्व कदाचित लवकर समजू शकणार नाही परंतु काही वर्षांनंतर त्यांनाही समजेल की हे To-Do-List बनविणे किती महत्त्वाची आहे.

मी येथे तुम्हाला To-Do-List ची यादी बनविण्याचे महत्व सांगण्याचा प्रयत्न करीत आहे आणि कदाचित त्यामुळे तुम्हीपण आपली कामे लिहण्यास आणि त्यांची प्राथमिकता निश्चित करायला सुरूवात कराल यात यत्किंचितही मला शंका नाही.

आपली स्मरणशक्तीला सुधारण्यासाठी To-do-list ची यादी बनविण्याची सवय लावली तर त्यातही सुधारणा होते. आपल्यापैकी प्रत्येकालाच त्यांना करावयाचे प्रत्येक काम ह्याची आठवण राहतेच असे नाही आणि असे बरेच लोक आहेत जे सहजपणे गोष्टी विसरतात आणि त्यांच्यासाठीच To-do-list बनविण्याची पद्धत फारच उपयोगी पडते.

एका संशोधना नुसार असे आढळले आहे की, एखाद्या सामान्य मनुष्याला लक्षात ठेवण्यासाठी काही माध्यम नसल्यास त्याला त्याची आठवण राहत नाही आणि त्याची शॉर्टटर्म-मेमरी पण त्याचप्रमाणे कार्य करायला लागते. उपरोक्त संशोधनानुसार, एक मनुष्य तीस सेकंदात फक्त सात वस्तुंची माहिती साठवू शकतो. सात पेक्षा अधिक माहिती लक्षात ठेवायची असल्यास त्यांला विसरण्याची सुरवात होते. म्हणूनच, To-Do-List तयार करणे आणि आपल्या कामांचा मागोवा ठेवणे महत्वाचे आहे.

उत्पादकता वाढविणे ह्याकरिता


To-Do-List आपल्याला फार मदत करते आणि आपली सर्व कार्ये To-Do-List मध्ये नोंदविली गेल्यास आपण प्रत्येक कार्य अगदी सहजपणे क्रमवारी लाऊन करू शकतो आणि महत्वाच्या कामांना प्राधान्य देऊ शकतो.

हार्वर्ड बिझिनेस रिव्यु द्वारे संशोधन केलेल्या एका अभ्यासानुसार असे म्हटले गेले आहे की वेळेचे व्यवस्थापन न झाल्यामुळे जवळजवळ 90% मॅनेजर आपल्या बहुमूल्य वेळ वाया घालवतात. परंतु To-Do-List बनविल्याने ते आपले लक्ष केंद्रित करण्यास व शेवटी आपली उत्पादकता वाढविण्यात यशस्वी झालेत.

माहिती व्यवस्थित ठेवण्याकरिता सुद्धा To-Do-List बनविण्याची सवय प्रभावी आहे.

आपल्याकडे To-Do-List असल्यास, कामांचे आयोजन व नियोजन करणे अधिक सुलभ होते.
एक व्यवस्थित यादी ठेवल्याने आपल्याला आपल्या कार्यांची स्पष्ट रूपरेषा ठेवण्याचे तसेच कार्य पूर्ण झाली की नाही याच्याकडे लक्ष केंद्रित करण्यास देखील मदत होते.
एकाच कागदावर आपल्या सर्व कामांची यादी ठेवल्यामुळे आपल्या तणावाची पातळीही कमी होईल त्याकरिता शांततेने बसून थोडा वेळ देऊन प्रत्येक मोठ्या आणि लहान कामांची यादी आपण बनवू शकतो.

आपण पहिल्यांदा To-Do-List तयार करण्याची प्रयत्न करीत असल्यास, तुम्हाला थोडासा तणाव वाटेल, परंतु चिंता करू नका कारण कालांतराने तुम्हालाच याची सवय होईल आणि यामुळे तुम्हाला त्याची कशी मदत झाली आणि हे किती सोपे आहे हे पाहून तुम्हीच आश्चर्यचकित व्हाल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण To-Do-List मधून पूर्ण झालेल्या कामांना आडवी रेषा मरून ते काम झाले आहे व त्यामुळे ते कॅन्सल करतेवेळी आपल्याला आपले कर्तृत्व आणि प्रगतीची भावना समाधान देऊन जाईल.

तर, आपण कशाची वाट पाहत आहात? आताच प्रारंभ करा आणि कधीही कोणतीही कार्ये किंवा ‘डेडलाइन पुन्हा गमावू नका. आपण आपल्या मित्राचा वाढदिवस विसरू इच्छित नाही, नाही ना? तर दररोज To-Do-List बनवून यशस्वी व्हा.

Habits

लहान आणि मोठ्या सवयी (Habits)

आपल्या पैकी बहुतेकांना  सकाळी लवकर उठणे, वजन कमी करणे, निरोगी राहणे , चांगल्या दर्जाचे अन्न खाणे, व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करणे, योगा करणे नवीन गोष्टी शिकणे, वाचन करुन ज्ञान वाढवणे आवडतेच. परंतु सर्वच लोक या गोष्टी  साध्य करू शकतात असे नाही. आपण दररोज जी छोटी छोटी कामे करतो त्यांच्या मध्ये आंतरिक संबंध असतो, ज्या आपणाला इतर कामे करण्यास प्रवृत्त करत असतात.  उदाहरणार्थ, जर आपण लवकर झोपायची सवय लावली  तर सकाळी लवकर उठता येईल ज्यामुळे सकाळी नियमित फिरायला जाणे सोपे होईल.  अशा प्रकारे आपल्या सवयींच्या  साखळ्या एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. अशा काही नियमांचा वापर करून आपण आपले जीवन सुखी आणि सुलभ व आनंदी बनवू शकतो. ह्या काही गोष्टी अधिक समजण्यासाठी  आपण दोन सवयींचा अभ्यास करू. ज्याचे वर्गीकरण मोठ्या सवयी आणि लहान सवयी असे करता येईल.

मोठ्या सवयी

प्रथम  मोठ्या सवयींबद्दल जाणून घेऊया. मोठ्या सवयीचा अर्थ असा आहे की आपण आधी पाहिल्याप्रमाणे ज्या सवयींचा एकमेकांशी संबंध आहे.  जर आपण या सवयींचे दररोज पालन केले तर त्याचा इतर सवयींवर परिणाम होईल आणि बरीच मेहनत घेऊन आपण आपले जीवन प्रचंड बदलू शकू. त्यांना मोठ्या * सवयी *म्हणता येईल. उदाहरणार्थ व्यायाम . जर आपण चालण्यासाठी गेलो किंवा व्यायाम केला तर, नंतर आपण एक ग्लास पाणी न कळता सहज पिऊ शकतो. त्याच बरोबर आपल्याला  चांगले अन्न खायला आवडायला लागेल. तर येथे असे आढळून येईल की, व्यायाम आपल्याला जाणीव नसतानाही इतर कामे करण्यास प्रवृत्त करत आहे.  अशा पद्धतीने आपण आपले इच्छित आरोग्य सहज मिळवू शकतो.

लहान सवयी

आता लहान सवयींबाबत बोलूया. या अशा सवयी आहेत ज्या आपण फारच कमी वेळात स्वतःहाला लावू शकतो. ह्या सवयी  आपल्याला चांगल्या म्हणजेच मोठ्या सवयी लावून घेण्यास  आपल्याला मदत करतील. छोट्या सवयींची काही उदाहरणे म्हणजे दररोज पाच मिनिटे व्यायाम करणे, अंथरुणावरुन उठून दररोज सकाळी एक ग्लास पाणी पिणे, दररोज एका पुस्तकाची दोन पाने वाचणे असे देता येईल. एका मोठी सवय सुरु करण्याऐवजी जर आपण काही दिवस या छोट्या सवयी स्वतः ला लावून घेतल्या  तर या लहान सवयी मोठ्या सवयींमध्ये बदलून जातील ज्या आपणाला आपले जीवन लक्ष्य सहजपणे साध्य करू शकण्यास फारच उपायुक्त ठरतील. आपण या लहान सवयी विकसित करायला पाहिजेत कारण, थोड्या वेळातच आपण या लहान सवयी सहज स्वतःला लाऊ शकतो.

या लहान सवयींचा वापर करून जर आपण मोठ्या सवयी विकसित केल्या तर आपण आपल्या इच्छेनुसार आपले जीवन बदलू शकतो.