MSBTE Related:
- RBTE TA-DA form
- Form no. 03
- MSBTE Norms and standards for eqipment – Mechanical Engg. Group
- MSBTE Remuneration details (10-Sep-2015)
- MSBTE Different type of Exam related Bill changes (10-Sep-2015)
- CIAAN Norms 2017
- Honorarium_Corrigendum
- MSBTE circular of Micro-Project for 5th Semester in group of 3 or 4
DTE related:
- Links to some important videos
- देयके वेळेत कशी पारित करावीत संपूर्ण पुस्तक 02.02.2021
- वेतन-पडताळणी-मार्गदर्शिका-संपूर्ण-पुस्तक-02.02.2021
- Hand book of gazetted officers and heads of office 2021
- List of holidays 2021
- Income Tax Slab Rates for FY 2020-21
- Circular परिपत्रक
- Annexure-II_F._Y._2020-21
- IT_Undertaking_F.Y._2020-2021
- सेवानिवृत्ती नंतर मिळणारे फायदे
- Pension guidelines
- preparation of a pension case
- Recommendations accepted by Govt for Pensioners
- Maharashtra Civil Services conduct Rules-1979-Modified-upto-1-3-2014
- Maharashtra Civil Service (Pay) Rules 1981
- 6th pay clarifications of AICTE 29 may 2020
- AICTE Diploma Pay Scales Qualifications and Prom
- AICTE 7th pay anomalies gazette
- Family Pension Nomination form
- Family details form
- Death-cum-Retirement Gratuity Nomination form
- GPF nomination form
- GIS nomination form
- Application for Medical Reimbursement
- Application for GPF (Refundable)
- Application for GPF (Non-Refundable)
- Application for House Building Advance (HBA)
- Application for Motor Car Advance (MCA)
- Application for festival advance
- Application for transfer
- Earned Leave application (EL) form
- Matta Va Dayitva (in Marathi)
- Changes in Admission Rules GR 22.7.2020
- RO TA-DA form
- 7th Pay Commission arrears 2nd installment
- State Government Employees Group Accidental Insurance Amendment Modification
- Medical Reimbursement of Group Insurance Scheme 2019
Income Slab and Tax Rates for FY 2020-21/ AY 2021-22
Income Tax Rate & Slab for Individuals & HUF:
Individual (Resident or Resident but not Ordinarily Resident or non-resident), who is of the age of less than 60 years on the last day of the relevant previous year & for HUF:
Taxable income | Tax Rate | Tax Rate |
(Existing Scheme) | (New Scheme) | |
Up to Rs. 2,50,000 | Nil | Nil |
Rs. 2,50,001 to Rs. 5,00,000 | 5% | 5% |
Rs. 5,00,001 to Rs. 7,50,000 | 20% | 10% |
Rs. 7,50,001 to Rs. 10,00,000 | 20% | 15% |
Rs. 10,00,001 to Rs. 12,50,000 | 30% | 20% |
Rs. 12,50,001 to Rs. 15,00,000 | 30% | 25% |
Above Rs. 15,00,000 | 30% | 30% |
सेवानिवृत्ती नंतर मिळणारे फायदे.
सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे पगारात तर वाढ झालेलीच आहे परंतु निवृत्ती नंतर मिळणाऱ्या लाभांमध्येदेखील बऱ्यापैकी वाढ झालेली आहे.पाहूया निवृत्ती नंतर मिळणारे फायदे कोणते?
ग्रॅच्युइटी सेवानिवृत्ती किंवा कमीत कमी ५ वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर दिलेला राजीनामा, सेवेमध्ये असताना मृत्यू झाल्यास,सेवेमध्ये असताना कायमस्वरूपी अपंगत्व किंवा आजारामुळे नोकरीवरून कमी केल्यास , आस्थापनाकडून कर्मचाऱ्याला दिली जाणारी भेट किंवा बक्षिस याला ग्रॅच्युइटी असे म्हणतात. ही ग्रॅच्युइटी सरकारी तसेच खाजगी कंपन्या,आस्थापना यामध्ये सेवा करणाऱ्या कामगारांना देखील मिळते. ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा त्या त्या आस्थापना ठरवितात. ६ व्या वेतन आयोगानुसार ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा १० लाख रूपये होती,७ व्या वेतन आयोगानुसार ही कमाल मर्यादा २० लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
ग्रॅच्युइटी किती मिळते. एकूण सेवा कालावधीची एकूण वर्षे.( त्यापुढे तीन ते सहा महिन्यांपर्यंत १ अर्धवर्ष आणि सहा महिन्यापेक्षा जास्त सेवा झाली असल्यास १ पूर्णवर्ष पकडले जाते)त्या एकूण वर्षांना प्रत्येक वर्षासाठी १५ दिवसाचे वेतन .(हे वेतन सेवानिवृत्ती पूर्वीच्या शेवटच्या महिन्याचे वेतन पकडले जाते .यामध्ये मूळ वेतन, विशेष वेतन, महागाई भत्ता, जोखीम भत्ता यांचा समावेश होतो.) यावेतनाला २६ ने भाग देऊन ( महिन्याला कामाचे दिवस २६ पकडून) एका दिवसाचे वेतन काढले जाते. ग्रॅच्युइटी काढण्याचे सूत्र= एक दिवसाचे वेतन ×१५×एकूण सेवा कालावधीची वर्षे=येणारी रक्कम ही त्यांची ग्रॅच्युइटी असेल. . उदा. शेवटच्या महिन्याचे मूळ वेतन -५६८०० +महागाई भत्ता-१२%=५६८००×१२%=६८१६+ग्रेड पे ५००=६४११६ हे महिन्याचे वेतन.एक दिवसाचे वेतन=६४११६÷२६=२४६६. म्हणजेच २४६६×१५×३०(सेवा कालावधी)=११०९७००/-रुपये एवढी ग्रॅच्युइटीची रक्कम होईल.
प्राव्हिडंट फंड किंवा भविष्य निर्वाह निधी. . . कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा कापून जाणारी प्राव्हिडंट फंडाची रक्कम, दरवर्षी मिळणाऱ्या व्याजासह सेवानिवृत्ती पर्यंत जेवढी जमा होते.ती सर्व रक्कम सेवानिवृत्तीनंतर ताबडतोब कर्मचाऱ्याला , किंवा सेवेमध्ये असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला दिली जाते.२००८नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू नसल्यामुळे त्यांना अन्अंशदायी भविष्य निर्वाह निधी (DCPS) योजना लागू आहे.त्यांच्या पगारातून यापूर्वी १२.५% व आस्थापना कडूनही १२.५%रक्कम दरमहा जमा होत होती.७ व्या वेतन आयोगात मूळ वेतन वाढवल्यामुळे ही रक्कम १०% करण्यात आली आहे.निवृत्तीनंतर व्याजासहीत जमा रकमेच्या ६०% रक्कम कर्मचाऱ्याला दिली जाते व ऊरलेल्या ४०% रकमेचे दरमहा तहहयात पेन्शन स्वरुपात व्याज दिले जाते.मृत्यूपश्चात वारसाला ही ४०% रक्कम दिली जाते.
निवृत्तीवेतन किंवा पेन्शन ज्या सरकारी किंवा निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात प्राव्हिडंट फंडांमध्ये आस्थापनाकडून कोणतीही रक्कम जमा केली जात नाही.त्यांच्या वेतनातून कापून गेलेलीच रक्कम व्याजासह त्यांना निवृत्तीनंतर मिळते.अशा कर्मचाऱ्यांना (सरकारी/निमसरकारी) सेवानिवृत्तीनंतर दिले जाणारे वेतन यालाच पेन्शन किंवा निवृत्तीवेतन असे म्हणतात.१००% निवृत्तीवेतन मिळण्यासाठी कमीत कमी २० वर्षे सातत्यपूर्ण सेवाकालावधी पूर्ण होणे आवश्यक असते.त्यापेक्षा कमी सेवा झाल्यास टक्केवारी नुसार निवृत्तीवेतन कमी होते. ६व्या वेतन आयोगानुसार शेवटच्या महिन्याच्या वेतनावर निवृत्तीवेतन काढले जाते.यामध्ये मूळ वेतनाच्या ५०% रक्कम ही निवृत्तीवेतनाचे मूळ वेतन असते.त्यावर प्रचलित दराने महागाई भत्ता जोडला जातो.(निर्देशांकानुसार जाहिर होईल तेवढा) उदा.शेवटच्या महिन्याचे मूळ वेतन – ५६८००.=५६८००÷ २ (अर्धे वेतन) =२८४०० हे मूळ निवृत्तीवेतन.याच्यावर निर्देशांकानुसार वेळोवेळी लागू असलेला महागाई भत्ता.(आजच्या दराने)=१२%.म्हणजेच,२८४००+३४०८= ३१८०८. हे झाले त्याचे एकूण निवृत्तीवेतन.यामध्ये वेळोवेळी वाढ होत जाते. (कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पती किंवा पत्नीला ५०% निवृत्तीवेतन तहहयात मिळत राहते.)
निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण ( पेन्शन विकणे) नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा अनुज्ञेय असलेल्या मूळ निवृत्तीवेतनाची ४०% रक्कम, (पूर्वी ही रक्कम १/३ होती) ठरलेल्या कॅटलॉग(तक्ता) मधील दरानुसार एकरकमी आगाऊ दिली जाते.हा दर सेवानिवृत्ती नंतरच्या येणाऱ्या पहिल्या वाढदिवशी वय किती यावर ठरतो .५८ व्या वर्षी निवृत्त झाल्यास हा दर ८.३७१ आहे.व ६० व्या वर्षी निवृत्त झाल्यास दर ८.१९४ एवढा आहे. उदा.२८४००×४०÷१००×१२×८.३१=११४११३५ . एवढी रक्कम मिळेल.व दरमहाच्या निवृत्तीवेतनातून ४०% रक्कम कमी करून निवृत्तीवेतन दिले जाईल. २८४००-११३६०=१७०४० एवढे मूळ वेतन व त्यावरील महागाई भत्ता आजच्या दराने १७०४ रुपये.=१७०४०+१७०४=१८७४४. एवढी पेन्शन मिळेल. सतत १५ वर्षे यापध्दतीने निवृत्तीवेतन घेतल्यानंतर जीवित असल्यास , हे ४०% कापलेले मूळ निवृत्तीवेतन पुन्हा वेतनात वर्ग केले जाते.व पूर्ण निवृत्तीवेतन (फुल पेन्शन) चालू होते.
रजेचे रोखीकरण (रजेचा पगार). ५वर्षापेक्षा जास्त सेवा झाल्यानंतर (कोणत्याही कारणाने) सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या रजा खाते शिल्लक असलेल्या अर्जित रजा (कमाल मर्यादा ३०० ) व अर्धवेतनी (सिक) रजेच्या
शिल्लक रजेच्या १/२ रजा. (म्हणजेच एकूण रजेच्या निम्म्या रजा. याला कमाल मर्यादा नाही). या दोन्ही रजेचे, सेवेतील शेवटच्या महिन्याला घेतलेल्या वेतना एवढ्या दराने (मूळ वेतन +महागाई भत्ता) रोखीकरण करून येणारी रक्कम ही त्या रजेचा पगार असतो.
कोणत्याही प्रकारे ५ वर्षापेक्षा जास्त सेवा झाल्यानंतर ही रक्कम मिळते. . . १ जानेवारी २०१६ ते १ जानेवारी २०१९ यामध्ये सेवानिवृत्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुध्दा ७व्या वेतन आयोगानुसार वरील सर्व फायदे अनुज्ञेय आहेत.त्यमुळे त्यांना आतापर्यंत मिळालेल्या लाभांमध्ये वाढ. व १जानेवारी २०१६ पासूनचा फरक (एरियर्स) अनुज्ञेय आहे. (वरील लेख मी मला उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे लिहिलेला आहे.यामध्ये काही बदल असू शकतो.