अभ्यास कसा करावा? – ह्याविषयी काही महत्त्वपूर्ण टिप्स

How to study? … a few important tips

अभ्यास कसा करावा? – ह्याविषयी काही महत्त्वपूर्ण टिप्स

बरेच विद्यार्थी एकत्र बसून तासन् तास अभ्यास करतात. परंतु जर आपण त्यांना ‘काल काय अभ्यास केला?’ याबद्दल विचारले तर त्यांना आठवत नाही. आपण जर वाचलेल्या गोष्टी लक्षात ठेवू इच्छित असू तर आपण ज्या ठिकाणी अभ्यास करतो ते ठिकाण महत्वाची भूमिका बजावत असते.

अशाच प्रकारे, आपण काही खबरदारी चे उपाय केल्यास आपण जे वाचत असतो त्या गोष्टी आपल्या मेंदूत कशा लक्षात ठेवता येतील? ह्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया.

१. अभ्यास करत असताना घरच्या लोकांना सांगून ठेवा जेणेकरुन तुम्ही अभ्यास करत असतांना ते तुम्हाला काही कामे सांगणार नाहीत व त्यामुळे तुमची अभ्यासातील एकाग्रता भंग होणार नाही.

२. अभ्यास करत असताना तुम्ही तुमचा मोबाइल फोन बंद ठेवला पाहिजे.

३. अभ्यासाला बसण्यापूर्वी – तुम्हाला किती वेळ शिकायचे आहे, कोणता विषय शिकायचा आहे, अशा गोष्टी आपण वेळेच्या आधी ठरवून अभ्यास सुरू करायला हवा.

४. अभ्यासाशी संबंधित सर्व पुस्तके तुम्ही जवळच आहे हे सुनिश्चित केले पाहिजे तसेच एक पेन आणि एक नोटबुक सुद्धा जवळ ठेवायला हवे. यामुळे तुमच्या अभ्यासाचा वेळ योग्य पद्धतीने मार्गी लागेल आणि तुमचा अभ्यास कोणताही अडथळा न येता होईल.

५. तसेच, अभ्यास करताना तुम्ही तुमचे डोके स्थिर ठेवले पाहिजे आणि डोळे हलवत अभ्यास केला तर तो तुम्हाला जलद वाचनास आणि अधिक एकाग्रतेने अभ्यास करण्यास मदत करेल.

५. ज्या ठिकानी तुम्ही अभ्यास करू इच्छिता ते ठिकाण तुम्ही सुनिश्चित केले पाहिजे की ते एक शांत ठिकाण आहे आणि तेथे काही गोंधळ होत नाहीये.

६. तुम्ही जिथे अभ्यास करत आहात तेथे एक स्टूल किंवा टेबल आहे याची खात्री करुन घ्यावी. बेडवर पडून किंवा सोफ्यावर पडून अभ्यास करू नये. जर तुम्ही असे केल्यास, त्याचा परिणाम तुमचा एकाग्रतेवर पडेल.

७. तसेच, दोन तास एकसारखे अभ्यास करण्यापेक्षा एक तास सक्रियपणे अभ्यास करणे चांगले आहे. परंतु जर तुम्हाला जास्त कालावधीसाठी अभ्यास करायचा असेल तर दहा किंवा पंधरा मिनिटांचा आराम करून पुन्हा अभ्यास करणे चांगले.

८. त्याचप्रमाणे, जेवणानंतर लगेच अभ्यास करणे चांगले नाही. जर तुम्ही असे केले तर तुम्ही झोपी येण्याची शक्यता आहे. जेवण घेतल्यानंतर, थोड्या वेळासाठी इकडे तिकडे फिरा आणि नंतर अभ्यास करा हे अधिक चांगले आहे.

तुम्ही वरील काही गोष्टींचे अनुसरण करत अभ्यास केला तर तुम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय, एकाग्रतेसह चांगले अभ्यास कराल ह्यात शंका नाही.

Happy studying…

God made the world so beautiful

देवाने हे जग इतके सुंदर बनविले आहे…

मित्रांनो थोडा विचार केला तर, या जगात सर्वकाही अनुकरण करण्यासारखे असंख्य उदाहरणे आहेत. त्यापैकी काही उदाहरणे पुढील प्रमाणे देता येतील.

१. कोळी हा एक जीव त्याच जाळं तुटल्यावर त्याबद्दल सूड न उगवता त्वरित नवीन जाळं पुन्हा तयार करण्यास तो सुरवात करतो.

२. असंख्य वेळा आपटल्यानंतर पुन्हा पुन्हा जोमाने उसळणाऱ्या समुद्राच्या लाटा आपल्या दृष्टीने एक उदाहरण आहेत.

३. जी रोप अंकुरण्यासाठी जमिनीला चिरडत बाहेर येतात ती आपल्यासाठी एक उदाहरण आहे.

४. मार्गात अनेक अडथळे असतानाही सरळ पुढे जाणारे बाण आपल्यासाठी एक उदाहरण आहे.

५. प्रतिद्वंद्वी शक्तिशाली असला तरी सूर्याला झाकून ठेवणारे ढग आपल्यासाठी एक उदाहरण आहे.

६. जे अशक्य आहे हे माहिती असतानाही आकाशास स्पर्श करण्याचा इच्छा ठेवणारा पतंग आमच्यासाठी एक उदाहरण आहे.

७. फ़ुलं ज्या ठिकाणी आहे त्या सभोवतालच्या ठिकाणी गोड सुगंध पसरवणारे फूल आपल्यासाठी एक उदाहरण आहे.

८. जे झाड प्रचंड उष्णता सहन करते परंतु थंड आणि आनंददायी छाया देते, ते आपल्यासाठी एक उदाहरण आहे.

९. वेगळे असलेल्या दोघा कापडाना पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न करणारी सुई आपल्यासाठी एक उदाहरण आहे.

१०. जग अंधारात नसावे म्हणून दररोज प्रकाशणारा सूर्य हा आपल्यासाठी एक उदाहरण आहे.

११. पावसाचा थेंब जरी छोटा असला तरी पृथ्वीची तहान शांत करण्यासाठी तो प्रयत्न करतो हे आपल्यासाठी एक उदाहरण आहे.

१२. अंधाराने वेढलेला असला तरी आपल्याला आनंददायक चांदणं देणारा चंद्र हा आपल्यासाठी एक उदाहरण आहे.

१३. आपण एकदा थोडेसे अन्न दिल्यानंतर जिवंतपणासाठी विश्वासू राहणारा कुत्रा आपल्यासाठी एक उदाहरण आहे.

१४. आपले आयुष्य कमी असाले तरी नेहमीच आनंदी राहोणारे फुलपाखरू हे आपल्यासाठी एक उदाहरण आहे.

१५. दूध पाण्यात मिसळून दिल्यावर फक्त दूध पिते पण पाणी नाही, असे करणारी हंस सांगते की फक्त चांगले घ्यावे आणि वाईट नव्हे.

म्हणूनच मित्रानो मी पुन्हा सांगतो की जर थोडा विचार करून पाहिल्यानंतर असे आढळेल की खरोखर या जगातील प्रत्येक गोष्ट आपल्या साठी आदर्शच आहे.

“To-Do List” बनविण्याचे महत्व

“To-Do List” बनविण्याचे महत्व


To-do List म्हणजे काय?

तर त्याची व्याख्या अशी सांगता येईल, “आपल्याला आवश्यक असलेल्या कामांची यादी बनविणे किंवा आपण करू इच्छित असलेल्या महत्वपूर्ण गोष्टींचं टिपण करून ठेवणे म्हणजेच To-do list.”

यशस्वी लोक त्यांची कार्ये, ध्येय किंवा इच्छित कामे साध्य करण्यासाठी काय करत असतील याबद्दल आपल्याला नेहमीच उत्सुकता असते.असे आढळले आहे की, यशस्वी लोकं आपले प्रत्येक काम लिहून ठेवतात आणि कोणते काम अधिक महत्वाचे आहे त्याचे वर्गीकरण करतात आणि नंतर त्या कामांना लहान लहान कामामध्ये विभाजित करतात.

काहींना To-Do-List चे महत्त्व कदाचित लवकर समजू शकणार नाही परंतु काही वर्षांनंतर त्यांनाही समजेल की हे To-Do-List बनविणे किती महत्त्वाची आहे.

मी येथे तुम्हाला To-Do-List ची यादी बनविण्याचे महत्व सांगण्याचा प्रयत्न करीत आहे आणि कदाचित त्यामुळे तुम्हीपण आपली कामे लिहण्यास आणि त्यांची प्राथमिकता निश्चित करायला सुरूवात कराल यात यत्किंचितही मला शंका नाही.

आपली स्मरणशक्तीला सुधारण्यासाठी To-do-list ची यादी बनविण्याची सवय लावली तर त्यातही सुधारणा होते. आपल्यापैकी प्रत्येकालाच त्यांना करावयाचे प्रत्येक काम ह्याची आठवण राहतेच असे नाही आणि असे बरेच लोक आहेत जे सहजपणे गोष्टी विसरतात आणि त्यांच्यासाठीच To-do-list बनविण्याची पद्धत फारच उपयोगी पडते.

एका संशोधना नुसार असे आढळले आहे की, एखाद्या सामान्य मनुष्याला लक्षात ठेवण्यासाठी काही माध्यम नसल्यास त्याला त्याची आठवण राहत नाही आणि त्याची शॉर्टटर्म-मेमरी पण त्याचप्रमाणे कार्य करायला लागते. उपरोक्त संशोधनानुसार, एक मनुष्य तीस सेकंदात फक्त सात वस्तुंची माहिती साठवू शकतो. सात पेक्षा अधिक माहिती लक्षात ठेवायची असल्यास त्यांला विसरण्याची सुरवात होते. म्हणूनच, To-Do-List तयार करणे आणि आपल्या कामांचा मागोवा ठेवणे महत्वाचे आहे.

उत्पादकता वाढविणे ह्याकरिता


To-Do-List आपल्याला फार मदत करते आणि आपली सर्व कार्ये To-Do-List मध्ये नोंदविली गेल्यास आपण प्रत्येक कार्य अगदी सहजपणे क्रमवारी लाऊन करू शकतो आणि महत्वाच्या कामांना प्राधान्य देऊ शकतो.

हार्वर्ड बिझिनेस रिव्यु द्वारे संशोधन केलेल्या एका अभ्यासानुसार असे म्हटले गेले आहे की वेळेचे व्यवस्थापन न झाल्यामुळे जवळजवळ 90% मॅनेजर आपल्या बहुमूल्य वेळ वाया घालवतात. परंतु To-Do-List बनविल्याने ते आपले लक्ष केंद्रित करण्यास व शेवटी आपली उत्पादकता वाढविण्यात यशस्वी झालेत.

माहिती व्यवस्थित ठेवण्याकरिता सुद्धा To-Do-List बनविण्याची सवय प्रभावी आहे.

आपल्याकडे To-Do-List असल्यास, कामांचे आयोजन व नियोजन करणे अधिक सुलभ होते.
एक व्यवस्थित यादी ठेवल्याने आपल्याला आपल्या कार्यांची स्पष्ट रूपरेषा ठेवण्याचे तसेच कार्य पूर्ण झाली की नाही याच्याकडे लक्ष केंद्रित करण्यास देखील मदत होते.
एकाच कागदावर आपल्या सर्व कामांची यादी ठेवल्यामुळे आपल्या तणावाची पातळीही कमी होईल त्याकरिता शांततेने बसून थोडा वेळ देऊन प्रत्येक मोठ्या आणि लहान कामांची यादी आपण बनवू शकतो.

आपण पहिल्यांदा To-Do-List तयार करण्याची प्रयत्न करीत असल्यास, तुम्हाला थोडासा तणाव वाटेल, परंतु चिंता करू नका कारण कालांतराने तुम्हालाच याची सवय होईल आणि यामुळे तुम्हाला त्याची कशी मदत झाली आणि हे किती सोपे आहे हे पाहून तुम्हीच आश्चर्यचकित व्हाल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण To-Do-List मधून पूर्ण झालेल्या कामांना आडवी रेषा मरून ते काम झाले आहे व त्यामुळे ते कॅन्सल करतेवेळी आपल्याला आपले कर्तृत्व आणि प्रगतीची भावना समाधान देऊन जाईल.

तर, आपण कशाची वाट पाहत आहात? आताच प्रारंभ करा आणि कधीही कोणतीही कार्ये किंवा ‘डेडलाइन पुन्हा गमावू नका. आपण आपल्या मित्राचा वाढदिवस विसरू इच्छित नाही, नाही ना? तर दररोज To-Do-List बनवून यशस्वी व्हा.

Habits

लहान आणि मोठ्या सवयी (Habits)

आपल्या पैकी बहुतेकांना  सकाळी लवकर उठणे, वजन कमी करणे, निरोगी राहणे , चांगल्या दर्जाचे अन्न खाणे, व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करणे, योगा करणे नवीन गोष्टी शिकणे, वाचन करुन ज्ञान वाढवणे आवडतेच. परंतु सर्वच लोक या गोष्टी  साध्य करू शकतात असे नाही. आपण दररोज जी छोटी छोटी कामे करतो त्यांच्या मध्ये आंतरिक संबंध असतो, ज्या आपणाला इतर कामे करण्यास प्रवृत्त करत असतात.  उदाहरणार्थ, जर आपण लवकर झोपायची सवय लावली  तर सकाळी लवकर उठता येईल ज्यामुळे सकाळी नियमित फिरायला जाणे सोपे होईल.  अशा प्रकारे आपल्या सवयींच्या  साखळ्या एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. अशा काही नियमांचा वापर करून आपण आपले जीवन सुखी आणि सुलभ व आनंदी बनवू शकतो. ह्या काही गोष्टी अधिक समजण्यासाठी  आपण दोन सवयींचा अभ्यास करू. ज्याचे वर्गीकरण मोठ्या सवयी आणि लहान सवयी असे करता येईल.

मोठ्या सवयी

प्रथम  मोठ्या सवयींबद्दल जाणून घेऊया. मोठ्या सवयीचा अर्थ असा आहे की आपण आधी पाहिल्याप्रमाणे ज्या सवयींचा एकमेकांशी संबंध आहे.  जर आपण या सवयींचे दररोज पालन केले तर त्याचा इतर सवयींवर परिणाम होईल आणि बरीच मेहनत घेऊन आपण आपले जीवन प्रचंड बदलू शकू. त्यांना मोठ्या * सवयी *म्हणता येईल. उदाहरणार्थ व्यायाम . जर आपण चालण्यासाठी गेलो किंवा व्यायाम केला तर, नंतर आपण एक ग्लास पाणी न कळता सहज पिऊ शकतो. त्याच बरोबर आपल्याला  चांगले अन्न खायला आवडायला लागेल. तर येथे असे आढळून येईल की, व्यायाम आपल्याला जाणीव नसतानाही इतर कामे करण्यास प्रवृत्त करत आहे.  अशा पद्धतीने आपण आपले इच्छित आरोग्य सहज मिळवू शकतो.

लहान सवयी

आता लहान सवयींबाबत बोलूया. या अशा सवयी आहेत ज्या आपण फारच कमी वेळात स्वतःहाला लावू शकतो. ह्या सवयी  आपल्याला चांगल्या म्हणजेच मोठ्या सवयी लावून घेण्यास  आपल्याला मदत करतील. छोट्या सवयींची काही उदाहरणे म्हणजे दररोज पाच मिनिटे व्यायाम करणे, अंथरुणावरुन उठून दररोज सकाळी एक ग्लास पाणी पिणे, दररोज एका पुस्तकाची दोन पाने वाचणे असे देता येईल. एका मोठी सवय सुरु करण्याऐवजी जर आपण काही दिवस या छोट्या सवयी स्वतः ला लावून घेतल्या  तर या लहान सवयी मोठ्या सवयींमध्ये बदलून जातील ज्या आपणाला आपले जीवन लक्ष्य सहजपणे साध्य करू शकण्यास फारच उपायुक्त ठरतील. आपण या लहान सवयी विकसित करायला पाहिजेत कारण, थोड्या वेळातच आपण या लहान सवयी सहज स्वतःला लाऊ शकतो.

या लहान सवयींचा वापर करून जर आपण मोठ्या सवयी विकसित केल्या तर आपण आपल्या इच्छेनुसार आपले जीवन बदलू शकतो.