Habits

लहान आणि मोठ्या सवयी (Habits)

आपल्या पैकी बहुतेकांना  सकाळी लवकर उठणे, वजन कमी करणे, निरोगी राहणे , चांगल्या दर्जाचे अन्न खाणे, व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करणे, योगा करणे नवीन गोष्टी शिकणे, वाचन करुन ज्ञान वाढवणे आवडतेच. परंतु सर्वच लोक या गोष्टी  साध्य करू शकतात असे नाही. आपण दररोज जी छोटी छोटी कामे करतो त्यांच्या मध्ये आंतरिक संबंध असतो, ज्या आपणाला इतर कामे करण्यास प्रवृत्त करत असतात.  उदाहरणार्थ, जर आपण लवकर झोपायची सवय लावली  तर सकाळी लवकर उठता येईल ज्यामुळे सकाळी नियमित फिरायला जाणे सोपे होईल.  अशा प्रकारे आपल्या सवयींच्या  साखळ्या एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. अशा काही नियमांचा वापर करून आपण आपले जीवन सुखी आणि सुलभ व आनंदी बनवू शकतो. ह्या काही गोष्टी अधिक समजण्यासाठी  आपण दोन सवयींचा अभ्यास करू. ज्याचे वर्गीकरण मोठ्या सवयी आणि लहान सवयी असे करता येईल.

मोठ्या सवयी

प्रथम  मोठ्या सवयींबद्दल जाणून घेऊया. मोठ्या सवयीचा अर्थ असा आहे की आपण आधी पाहिल्याप्रमाणे ज्या सवयींचा एकमेकांशी संबंध आहे.  जर आपण या सवयींचे दररोज पालन केले तर त्याचा इतर सवयींवर परिणाम होईल आणि बरीच मेहनत घेऊन आपण आपले जीवन प्रचंड बदलू शकू. त्यांना मोठ्या * सवयी *म्हणता येईल. उदाहरणार्थ व्यायाम . जर आपण चालण्यासाठी गेलो किंवा व्यायाम केला तर, नंतर आपण एक ग्लास पाणी न कळता सहज पिऊ शकतो. त्याच बरोबर आपल्याला  चांगले अन्न खायला आवडायला लागेल. तर येथे असे आढळून येईल की, व्यायाम आपल्याला जाणीव नसतानाही इतर कामे करण्यास प्रवृत्त करत आहे.  अशा पद्धतीने आपण आपले इच्छित आरोग्य सहज मिळवू शकतो.

लहान सवयी

आता लहान सवयींबाबत बोलूया. या अशा सवयी आहेत ज्या आपण फारच कमी वेळात स्वतःहाला लावू शकतो. ह्या सवयी  आपल्याला चांगल्या म्हणजेच मोठ्या सवयी लावून घेण्यास  आपल्याला मदत करतील. छोट्या सवयींची काही उदाहरणे म्हणजे दररोज पाच मिनिटे व्यायाम करणे, अंथरुणावरुन उठून दररोज सकाळी एक ग्लास पाणी पिणे, दररोज एका पुस्तकाची दोन पाने वाचणे असे देता येईल. एका मोठी सवय सुरु करण्याऐवजी जर आपण काही दिवस या छोट्या सवयी स्वतः ला लावून घेतल्या  तर या लहान सवयी मोठ्या सवयींमध्ये बदलून जातील ज्या आपणाला आपले जीवन लक्ष्य सहजपणे साध्य करू शकण्यास फारच उपायुक्त ठरतील. आपण या लहान सवयी विकसित करायला पाहिजेत कारण, थोड्या वेळातच आपण या लहान सवयी सहज स्वतःला लाऊ शकतो.

या लहान सवयींचा वापर करून जर आपण मोठ्या सवयी विकसित केल्या तर आपण आपल्या इच्छेनुसार आपले जीवन बदलू शकतो.

Leave a Comment