“To-Do List” बनविण्याचे महत्व
To-do List म्हणजे काय?
तर त्याची व्याख्या अशी सांगता येईल, “आपल्याला आवश्यक असलेल्या कामांची यादी बनविणे किंवा आपण करू इच्छित असलेल्या महत्वपूर्ण गोष्टींचं टिपण करून ठेवणे म्हणजेच To-do list.”
यशस्वी लोक त्यांची कार्ये, ध्येय किंवा इच्छित कामे साध्य करण्यासाठी काय करत असतील याबद्दल आपल्याला नेहमीच उत्सुकता असते.असे आढळले आहे की, यशस्वी लोकं आपले प्रत्येक काम लिहून ठेवतात आणि कोणते काम अधिक महत्वाचे आहे त्याचे वर्गीकरण करतात आणि नंतर त्या कामांना लहान लहान कामामध्ये विभाजित करतात.
काहींना To-Do-List चे महत्त्व कदाचित लवकर समजू शकणार नाही परंतु काही वर्षांनंतर त्यांनाही समजेल की हे To-Do-List बनविणे किती महत्त्वाची आहे.
मी येथे तुम्हाला To-Do-List ची यादी बनविण्याचे महत्व सांगण्याचा प्रयत्न करीत आहे आणि कदाचित त्यामुळे तुम्हीपण आपली कामे लिहण्यास आणि त्यांची प्राथमिकता निश्चित करायला सुरूवात कराल यात यत्किंचितही मला शंका नाही.
आपली स्मरणशक्तीला सुधारण्यासाठी To-do-list ची यादी बनविण्याची सवय लावली तर त्यातही सुधारणा होते. आपल्यापैकी प्रत्येकालाच त्यांना करावयाचे प्रत्येक काम ह्याची आठवण राहतेच असे नाही आणि असे बरेच लोक आहेत जे सहजपणे गोष्टी विसरतात आणि त्यांच्यासाठीच To-do-list बनविण्याची पद्धत फारच उपयोगी पडते.
एका संशोधना नुसार असे आढळले आहे की, एखाद्या सामान्य मनुष्याला लक्षात ठेवण्यासाठी काही माध्यम नसल्यास त्याला त्याची आठवण राहत नाही आणि त्याची शॉर्टटर्म-मेमरी पण त्याचप्रमाणे कार्य करायला लागते. उपरोक्त संशोधनानुसार, एक मनुष्य तीस सेकंदात फक्त सात वस्तुंची माहिती साठवू शकतो. सात पेक्षा अधिक माहिती लक्षात ठेवायची असल्यास त्यांला विसरण्याची सुरवात होते. म्हणूनच, To-Do-List तयार करणे आणि आपल्या कामांचा मागोवा ठेवणे महत्वाचे आहे.
उत्पादकता वाढविणे ह्याकरिता
To-Do-List आपल्याला फार मदत करते आणि आपली सर्व कार्ये To-Do-List मध्ये नोंदविली गेल्यास आपण प्रत्येक कार्य अगदी सहजपणे क्रमवारी लाऊन करू शकतो आणि महत्वाच्या कामांना प्राधान्य देऊ शकतो.
हार्वर्ड बिझिनेस रिव्यु द्वारे संशोधन केलेल्या एका अभ्यासानुसार असे म्हटले गेले आहे की वेळेचे व्यवस्थापन न झाल्यामुळे जवळजवळ 90% मॅनेजर आपल्या बहुमूल्य वेळ वाया घालवतात. परंतु To-Do-List बनविल्याने ते आपले लक्ष केंद्रित करण्यास व शेवटी आपली उत्पादकता वाढविण्यात यशस्वी झालेत.
माहिती व्यवस्थित ठेवण्याकरिता सुद्धा To-Do-List बनविण्याची सवय प्रभावी आहे.
आपल्याकडे To-Do-List असल्यास, कामांचे आयोजन व नियोजन करणे अधिक सुलभ होते.
एक व्यवस्थित यादी ठेवल्याने आपल्याला आपल्या कार्यांची स्पष्ट रूपरेषा ठेवण्याचे तसेच कार्य पूर्ण झाली की नाही याच्याकडे लक्ष केंद्रित करण्यास देखील मदत होते.
एकाच कागदावर आपल्या सर्व कामांची यादी ठेवल्यामुळे आपल्या तणावाची पातळीही कमी होईल त्याकरिता शांततेने बसून थोडा वेळ देऊन प्रत्येक मोठ्या आणि लहान कामांची यादी आपण बनवू शकतो.
आपण पहिल्यांदा To-Do-List तयार करण्याची प्रयत्न करीत असल्यास, तुम्हाला थोडासा तणाव वाटेल, परंतु चिंता करू नका कारण कालांतराने तुम्हालाच याची सवय होईल आणि यामुळे तुम्हाला त्याची कशी मदत झाली आणि हे किती सोपे आहे हे पाहून तुम्हीच आश्चर्यचकित व्हाल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण To-Do-List मधून पूर्ण झालेल्या कामांना आडवी रेषा मरून ते काम झाले आहे व त्यामुळे ते कॅन्सल करतेवेळी आपल्याला आपले कर्तृत्व आणि प्रगतीची भावना समाधान देऊन जाईल.
तर, आपण कशाची वाट पाहत आहात? आताच प्रारंभ करा आणि कधीही कोणतीही कार्ये किंवा ‘डेडलाइन पुन्हा गमावू नका. आपण आपल्या मित्राचा वाढदिवस विसरू इच्छित नाही, नाही ना? तर दररोज To-Do-List बनवून यशस्वी व्हा.